लंडन : स्वदेशी बनावटीच्या कोव्हॅक्सीन लसीची प्राण्यांवरील चाचणी यशस्वी ठरलेली असताना आणखी एक आनंदाची बातमी आली आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अस्त्राझेनेकाने कोरोना लसीच्या चाचण्या पुन्हा सुरू केल्या आहेत.
ब्रिटनमध्ये मानवी चाचणीत ऑक्सफर्डच्या लसीचा डोस दिल्यानंतर एक व्यक्ती आजारी पडला होता. त्यामुळे अस्त्राझेनेकाने या चाचण्या जगभरात स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. लसीचा डोस दिल्यानंतर या व्यक्तीवर दुष्परिणाम कसे झाले, त्याचा तजज्ञांंच्या स्वतंत्र पथकांकडून तपास सुरु झाला होता.
आता यूकेमधल्या आरोग्य नियंत्रकांनी पुन्हा ऑक्सफर्डच्या लसीच्या चाचण्या सुरु करण्याची परवानगी दिली आहे. जगभरात आतापर्यंत १८ हजार स्वयंसेवकांना या लसीचा डोस देण्यात आला.
विनोद पाटील यांची सुप्रीम कोर्टात धाव