23.8 C
Latur
Friday, September 24, 2021
Homeआंतरराष्ट्रीय२९ देशांमध्ये ऑक्सिजनची कमतरता

२९ देशांमध्ये ऑक्सिजनची कमतरता

एकमत ऑनलाईन

जिनेव्हा : भारतात सर्वप्रथम आढळलेला जीवघेणा डेल्टा व्हेरियंट आता जगातील १३२ देशांमध्ये पसरला आहे. डेल्टाची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. या अनुषंगाने संयुक्त राष्ट्राची आरोग्य संस्था जागतिक आरोग्य संघटनेने चिंता व्यक्त केली असून, जगातील २९ देशात ऑक्सिजनचा तुटवडा भासत असल्याने समस्या गंभीर बनली आहे़

जगभरात कोरोनाबाधितांची संख्या आणि मृत्यू संख्या वाढत असून, ही चिंतेची बाब आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. डब्यूएचओच्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात जगभरात ४० लाख नवे कोरोनाबाधित प्रकरणे आढळली होती. जर पुढे अशीच प्रकरणाची नोंद होत गेली, तर दोन आठवड्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या २० कोटी पार होईल.

जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस घेब्रेयेसेस यांनी पत्रकार परिषदे दरम्यान जिनेव्हामध्ये सांगितले की, सध्या होत असलेली कोरोनाबाधितांची नोंद खूप जास्त आहे. तसेच अनेक देश आपली वास्तविक रुग्णसंख्या समोर आणत नाही आहेत. संघटनेतील ६ पैकी ५ क्षेत्र असे आहेत, जिथे कोरोना प्रकरणे ८० टक्क्यांनी वाढले आहे. मागील ४ आठवड्यापेक्षा दुप्पट झाले आहे. यादरम्यान आफ्रिकेत कोरोनामुळे मृत्यूची संख्या जवळपास ८० टक्के वेगाने वाढत आहे. कोरोनाबाधितांची वाढत असलेल्या संख्येचे कारण डेल्टा व्हेरियंट सांगितले आहे.

सध्या कोरोनाचे चार व्हेरियंटस्
सध्या डब्यूएचओ आपल्या वैज्ञानिकांसोबत डेल्टा व्हेरियंट इतक्या वेगाने का पसरत आहे? याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे. याबाबत संघटनेने इशारा देखील दिला आहे. यामध्ये म्हटले आहे की, कोरोना व्हायरस सतत आपले रुप बदलत आहे. कोरोनाचे असे चार व्हेरियंट आहेत, ज्या फैलाव जास्त होत आहे. त्यामुळे हे चिंताजनक आहे. जोपर्यंत व्हायरसचा प्रभाव रोखू शकत नाही तोपर्यंत कोरोनाची नवनवीन रुप समोर येतील. त्यामुळे कोरोनाच्या नियमांचे पालन करणे खूप महत्त्वाचे आहे. २९ देशांमध्ये कोरोनाची प्रकरणे वाढत असल्यामुळे ऑक्सिजनची कमतरता भासत आहे.

 

जुलैमध्ये सहा लाख कोटी रुपयांचे विक्रमी व्यवहार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या