इस्लामाबाद : पाकिस्तानातील बन्नू जिल्ह्यातील काउंटर टेररिझम सेंटर ताब्यात घेणा-या तहरीक-ए-तालिबानच्या ३३ दहशतवाद्यांना पाकिस्तानी लष्कराने ठार केले आहे. संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी संसदेत ही माहिती दिली. दरम्यान, या कारवाईत २ कमांडोही मारले गेले आहेत.
सुमारे तीन दिवसांपासून तहरिक-ए-तालिबानच्या दहशतवाद्यांनी एका मेजरसह चार जवानांना बंदी ठेवले होते. त्यानंतर पाकिस्तानने १६ मौलवींची एक टीम अफगाणिस्तानला चर्चेसाठी पाठवली होती. त्यांचा उद्देश होता की अफगाण तालिबानला टीटीपीच्या दहशतवाद्यांना आत्मसमर्पणासाठी तयार करतील. परंतू हा प्रयत्न अयशस्वी ठरला.
टीटीपीचे दहशतवादी अफगाणिस्तानात जाण्यासाठी हेलिकॉप्टरची मागणी करत असल्याचा दावा काही मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. अखेर पाकिस्तानी लष्कराने ४० तास लष्करी कारवाई केली. या कारवाईचे संपूर्ण श्रेय लष्कराला देताना संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले की खैबर पख्तूनख्वाचे सरकार दहशतवाद रोखण्यात पूर्णपणे पराभूत झाले आहे. या कारवाईचे संपूर्ण श्रेय लष्कराला देताना संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले की खैबर पख्तूनख्वाचे सरकार दहशतवाद रोखण्यात पूर्णपणे पराभूत झाले आहे.
दहशतवाद्यांनी अधिका-याचीही केली हत्या
टीटीपीच्या दहशतवाद्यांनी खैबर पख्तूनख्वा राज्यातील बन्नू जिल्ह्यातील दहशतवादविरोधी केंद्रावर कब्जा केला. चार जवानांसह काही लोकांना ओलीस बनविण्यात आले. एकाचा खूनही झाला होता. परिस्थिती इतकी वाईट होती की पाकिस्तान सरकार ओलीस सोडण्यास असमर्थ ठरले.