24 C
Latur
Sunday, September 25, 2022
Homeआंतरराष्ट्रीयपाक परराष्ट्रमंत्री कोरोनाग्रस्त

पाक परराष्ट्रमंत्री कोरोनाग्रस्त

एकमत ऑनलाईन

इस्लामाबाद: पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: शुक्रवारी ट्विट करुन कोरोना व्हायरसची बाधा झाल्याची माहिती दिली. कुरेशी नियमानुसार क्वारंंटाइन झाले आहेत. कोरोनाची लागण झालेले ते पाकिस्तानातील वरिष्ठ राजकारणी आहेत.

आज दुपारी आपल्याला सौम्य ताप आला होता. कोरोना चाचणी केल्यानंतर आपला रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. कोरोनाची लागण झाली असली तरी, आपल्याला सशक्त वाटत असून आपल्यामध्ये ऊर्जा कायम आहे. आपण घरातूनच सर्व काम करणार आहे. कृपाकरुन माझ्यासाठी प्रार्थना करा, असे कुरेशी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Read More  पारनेरमध्ये शिवसेनेचे ५ नगरसेवक राष्ट्रवादीत

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या