24 C
Latur
Sunday, September 25, 2022
Homeआंतरराष्ट्रीयपाकची कोरोनावर मात ? नव्हे झोलझाल

पाकची कोरोनावर मात ? नव्हे झोलझाल

एकमत ऑनलाईन

इस्लामाबाद : कोरोनावर नियंत्रण मिळवल्याचा दावा पाकिस्तानकडून करण्यात येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही जगाला पाकिस्तानकडून शिकण्याचा सल्ला दिला. मात्र हा निव्वळ झोलझाल असल्याचे वृत्त बीबीसीने दिले आहे.
चाचण्याच कमी केल्या

पाकिस्तान आधीपासून बिकट आरोग्य व्यवस्था, आर्थिक संकटाचा सामना करत होता. अशातच एप्रिल-मे-जून या महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत होती. त्यानंतर अचानक नवीन कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत असल्याचे समोर आले. हे एखाद्या चमत्कारासारखेच आहे. कोरोनामुळे वाढत्या असंतोषाला रोखण्यासाठी इम्रान खान सरकारने कोरोना चाचण्याच कमी केल्या. त्यामुळेच कोरोनाबाधितांची संख्या कमी आढळली जात असल्याचे बीबीसीने म्हटले आहे. पाकिस्तानमध्ये एका दिवसात ३० हजार कोरोना चाचण्या केल्या.

२० चाचण्यांमागे प्रत्येक ८ वी व्यक्ति बाधित
बीबीसीनुसार, भारताच्या तुलनेत पाकिस्तानची लोकसंख्या कमी आहे. मात्र, तरीदेखील १० लाख नागरिकांमध्ये १४०० इतके कोरोना चाचणीचे प्रमाण आहे. तर, भारतात हेच प्रमाण ३७०० च्यावर आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, २०जणांची करोना चाचणी केल्यास एक कोरोनाबाधित आढळत असल्यास कोरोना नियंत्रणात असल्याचे म्हटले जाते. मात्र, पाकिस्तानमध्ये कोरोना चाचणीच्या दरम्यान, प्रत्येक आठवी व्यक्ती ही कोरोनाबाधित आढळते. भारतात दर ११ वी व्यक्ती बाधित आढळते.

भारतातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची चीनकडून हेरगिरी

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या