24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeआंतरराष्ट्रीयपाक भीषण पूरस्थिती

पाक भीषण पूरस्थिती

एकमत ऑनलाईन

इस्लामाबाद : पाकिस्तान मोठे नैसर्गिक संकट कोसळले आहे. पाकिस्तानमध्ये सध्या भीषण पूरस्थिती असून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवत आहे. पूरस्थितीमुळे नागरिकांना अन्न आणि पाणी यासारख्या जीवनावश्यक वस्तूंचाही तुटवडा निर्माण झाला आहे. पुरामुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे, तर लाखो जनावरांचाही बळी गेला आहे. महापुरामुळे पाकिस्तानमधील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अन्न-पाण्याविना बालकांचे हाल झाले आहेत.

पूरस्थितीमुळे लहान मुलांचे अधिक हाल होताना पाहायला मिळत आहेत. सततच्या पावसामुळे मुले अधिक प्रमाणात आजारी पडत आहेत. संयुक्त राष्ट्राने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानातील महापुरामुळे सुमारे एक कोटी ६० लाख बालकांना पुराचा फटका बसला आहे. यामध्ये सुमारे ४० लाख बालकांना वैद्यकीय सेवेची आवश्यकता आहे.

युनिसेफने दिली माहिती
यूएन इंटरनॅशनल चिल्ड्रेन्स इमर्जन्सी फंडचे (युनिसेफ) प्रतिनिधी अब्दुल्ला फदील यांनी शुक्रवारी पूरग्रस्त भागाला भेट दिली. दोन दिवसांच्या भेटीनंतर दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, पाकिस्तानच्या पूरग्रस्त भागातील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. लहान मुलांना अतिसार, डेंग्यू आजारांची लागण होण्याचे प्रमाण अधिक आहे. अनेक बालके कुपोषित आहेत. ताप, त्वचा रोगांनी आणि इतर रोगांची लागण झाल्याने आतापर्यंत सुमारे ५२८ मुलांचा मृत्यू झाला आहे. यापैकी प्रत्येक मृत्यू ही एक शोकांतिका आहे. हे मृत्यू जी टाळता आले असते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या