Saturday, September 23, 2023

पाकिस्तान एअरलाईन्सच्या विमानांना अमेरिकेत बंदी

इस्लामाबाद: युरोपीय संघास अमेरिकेने पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सच्या विमान उड्डाणांवर सहा महिन्यांसाठी बंदी घातली आहे. पीआयए ही पाकिस्तान सरकारच्या अखत्यारीतील विमान कंपनी आहे. वैमानिकांच्या बनावट परवान्यांचे प्रकरण पुढे आल्याने पीआयए सध्या जगभरात चेष्टेचा विषय बनली आहे. त्यातून युरोपीय संघाने मंगळवारी आपले सदस्य असणाऱ्या 32 देशांना पाकिस्तानी वैमानिकांवर बंदी घालण्याची सूचना केली.

त्यापाठोपाठ अमेरिकेने पीआयएच्या उड्डाणांवर बंदी घातली आहे. तो निर्णय पीआयएला ई-मेलद्वारे कळवण्यात आला. युरोपीय संघ आणि अमेरिकेच्या निर्णयांमुळे पाकिस्तानची जगभरात फटफजिती झाली आहे. पाकिस्तानच्या कराची शहरात मे महिन्यात पीआयएचे एक विमान रहिवासी भागात कोसळले. त्या दुर्घटनेत 97 जण मृत्युमुखी पडले.

दुर्घटनेच्या चौकशीतून पीआयएच्या वैमानिकांविषयीचे भयानक वास्तव समोर आले. अनेक वैमानिकांनी बनावट पदव्या आणि परवाने मिळवल्याचे स्पष्ट झाले. पाकिस्तान सरकारनेच त्याबाबतची माहिती संसदेत दिली. एवढेच नव्हे तर, बनावट परवानेधारक असल्याच्या संशयावरून पाकिस्तानात 262 वैमानिकांना सेवेतून निलंबित करण्यात आले.

Read More  चीनचे पुन्हा एकदा भाई भाई

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या