24.7 C
Latur
Monday, June 14, 2021
Homeआंतरराष्ट्रीयपाकची समितीत राहण्याची लायकी नाही

पाकची समितीत राहण्याची लायकी नाही

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि संयुक्त राष्ट्रांचा पाठिंबा असणारी स्वयंसेवी संस्था यूएन वॉचमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरून वाकयुद्ध सुरु झाले आहे. इम्रान खान यांनी फ्रान्सवर टीका करताना ट्विट केले़ त्यात ते म्हणाले, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली ईशनिंदा सहन करणार नाही. यावर रीट्विट करत यूएन या आंतरराष्ट्रीय संघटनेने इम्रान खान यांच्यावरच टीका केली आहे. संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार संघटनेचा (यूएनएचएआर) सदस्य असण्याची पाकिस्तानची योग्यता नाही, असे यूनने म्हटले आहे.

पाकिस्तानवर सतत मानवाधिकारांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला जातो. तरीदेखील चीन आणि रशियाबरोबर या वर्षी पाकिस्तानलाही संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार संघटनेचे सदस्यत्व दिले होते़ त्यावेळी देखील यूएन वॉचने पाकिस्तानचा या यादीत समावेश करण्यास विरोध दर्शवला होता.

पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याक नागरिकांना त्रास देण्यासाठी ईशंनिंदा कायद्याचा वापर केला जातो. ईशनिंदा हा पाकिस्ताानात सर्वात मोठा गुन्हा मानला जातो. हुकूमशहा जिया-उल-हक यांच्या कालखंडात पाकिस्तानमध्ये ईशनिंदा हा कायदा लागू करण्यात आला होता. पाकिस्तान दंडविधान कायद्यामधील कलम २९५-बी आणि २९५-सी एकत्र करून हा ईशनिंदेचा कायदा तयार करण्यात आला होता.

परंतु खरेतर हा कायदा पाकिस्तानला ब्रिटिश सरकारकडून वारसाहक्काने मिळाला आहे. १८६० मध्ये ब्रिटिश सरकारने या कायद्याची निर्मिती केली होती. त्यानंतर पुढे पाकिस्तान सरकारने ईशनिंदा कायदा म्हणून लागू केला. मानवाधिकार संस्था मूव्हमेंट फॉर सॉलिडॅरिटी अँड पीसच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानमध्ये दरवर्षी १ हजार ख्रिश्चन आणि हिंदू महिला आणि मुलींचे अपहरण केले जाते़ त्यानंतर त्यांचे धर्मांतर करून त्यांचा जबरदस्ती मुस्लिम व्यक्तीशी निकाह केला जातो. साधारणपणे १२ ते २५ या वयोगटातील मुलींचे अपहरण केले जाते़ त्यामुळे तरुण मुलींचे अपहरण होण्याचे प्रमाण जास्त आहे.

संयुक्त राष्ट्र समर्थित संस्था
यूएन वॉच ही एक संयुक्त राष्ट्रांचा पाठिंबा असणारी एनजीओ आहे. अमेरिकन ज्यु समिती ही एनजीओ चालवत आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेला विशेष सल्ला देणारी मान्यताप्राप्त ही एनजीओ आहे. ही एनजीओ डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कांगो आणि डारफुरमध्ये मानवाधिकारांच्या हक्काचे उल्लंघन होत असल्यास त्यांना सहकार्य करण्याचे कार्य करते. त्याचबरोबर चीन, क्यूबा, रशिया आणि व्हेनेझुएलामध्येदेखील मानवाधिकार हक्कांचे उल्लंघन होत असल्यास त्या ठिकाणी न्याय मिळवून देण्याचे काम ही संस्था करते.

‘गूगल पे’भोवती सीसीआयचा फास

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या