29.7 C
Latur
Monday, January 25, 2021
Home आंतरराष्ट्रीय पाकव्याप्त काश्मिरातील संकेतस्थळ हॅक

पाकव्याप्त काश्मिरातील संकेतस्थळ हॅक

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली: पाकव्याप्त काश्मीरच्या माहिती जनसंपर्क संचालनालयाची वेबसाइट हॅक करण्यात आली आहे. ही वेबसाइट हॅक करून त्यावर पाकिस्तानला दणका देणारा मेसेज लिहिण्यात आला आहे. पाकिस्तानपासून आम्हाला मुक्ती हवी आह़े या मेसेजमध्ये म्हटले आहे़ पाकिस्तानमधील पंतप्रधान इम्रान खान यांचे सरकार मानवाधिकारांचे उल्लंघन करण्यात येत असल्याचा आरोप मेसेजमधून करण्यात आला आहे.

आझाद जम्मू-काश्मीरच्या जनतेला पाकिस्तानच्या कारवायांपासून मुक्ती आहे. पाकिस्तानी सैन्य आणि पोलिसांकडून मानवाधिकार पायदळी तुडवण्यात येत आहेत. निष्पाप नागरिकांचे हाल केले जात असून, दहशतवाद पसरवला जात आहे. गेल्या ७० वर्षापासून आझाद जम्मू-काश्मीवर पाकिस्तानी शासकांकडून अनन्वीत अत्याचार केले जात आहेत. पाकच्या या भेदभाव करणा-या धोरणाचा आम्ही निषेध करतो, असा मेसेज हॅकरने लिहिला आहे.

पाकिस्तानचे एफ-१६ विमान पाडले होते
भारतीय हवाई दलाच्या कारवाईत पाकिस्तानचे एफ-१६ हे विमान पाडण्यात आले होते. याचाही उल्लेख हॅकरने मेसेजमध्ये केला आहे. पाकिस्तान हवाई दलाचे एफ-१६ हे विमान गेल्यावर्षी भारतीय हवाई दलाने पाडले होते. मात्र हे गुपित पाकिस्तान जनतेपासून लपवत आहे. यात ठार झालेला पायलट आणि त्याच्या कुटुंबीयांबद्दल आम्हाला आदर आहे. लवकरच याचे सत्य बाहेर येईल, असा इशाराही हॅकरने पाकिस्तान सरकारला दिला आहे.

Read More  अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रसिद्ध गायक वेस्ट मैदानात?

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,418FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या