इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ हे कतारमध्ये होणा-या यूएनच्या अल्प विकसित देशांच्या परिषदेत सहभागी होणार आहेत. कतारचे शासक शेख तमीम बिन हमाद अल थानी यांच्या निमंत्रणावरून ढट शाहबाज रविवारी दोन दिवसांच्या दोहा दौ-यावर पोहोचणार आहेत. ही संयुक्त राष्ट्र परिषद ९ मार्चपर्यंत चालणार आहे. यात जगातील अल्प विकसित देशांमध्ये शाश्वत विकासाला गती देण्यावर चर्चा होईल.
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने शनिवारी ही माहिती दिली. परिषदेत सहभागी सर्व देशांचे नेते विकासाबाबत एकमेकांशी सहकार्य करण्यावर चर्चा करतील. यासोबतच विकसनशील देशांसोबत चांगल्या भागीदारीवरही चर्चा केली जाईल. याशिवाय पंतप्रधान शाहबाज परिषदेला उपस्थित असलेल्या इतर देशांच्या नेत्यांशी द्विपक्षीय चर्चाही करणार आहेत.
यूएनच्या सर्वात कमी विकसित देशांच्या यादीत ४६ देश आहेत. यामध्ये अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, नेपाळ, म्यानमारसह आशियातील ९ देशांचा समावेश आहे. मात्र, या यादीत पाकिस्तानचे नाव नाही. अल्प विकसित देशांना वठ कडून अनेक सवलती मिळतात. यासोबतच आर्थिक, तांत्रिक अशा अनेक क्षेत्रात मदतीसाठी या देशांना प्राधान्य दिले जाते.