इस्लामाबाद : जम्मू-काश्मीर मुद्यावर भारताविरोधात कायम आक्रमक भुमिका घेणा-या पाकिस्तानच्या भुमिकेत नरमाईचा सूर आल्याचे दिसत आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कामर जावेद बाजवा यांच्या वक्तव्यातून हे दिसून येत आहे. भारत-पाकिस्तानने सन्मानजनक आणि शांततामय मार्गाने तोडगा काढावा, असे पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कामर जावेद बाजवा यांनी म्हटले आहे.
खैबर-पख्तूनख्वा प्रांतातील रिसालपूर येथील पाकिस्तान एअर फोर्सच्या पदवी प्रदान कार्यक्रमात बोलताना जनरल बाजवा यांनी हे मत व्यक्त केले. जम्मू-काश्मीर हा भारत-पाकिस्तानमधील पूर्वीपासून चालत आलेला मुद्दा आहे. दोन्ही देशांनी यावर सन्मानजनक आणि शांततामय मार्गाने यावर तोडगा काढावा असे जनरल बाजवा यांनी म्हटले आहे.
जम्मू-काश्मीरच्या मुद्दावर पाकिस्तान तिस-या पक्षाच्या हस्तक्षेपासाठी प्रयत्नशील होते. पण आता भारत-पाकिस्तानने शांततामय मार्गाने तोडगा काढावा हे बाजवा यांचे विधान अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण ठरते. परस्परांचा आदर आणि शांततेने एकत्र राहणे, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. शांततेसाठी सर्व दिशांना हात पुढे करण्याची ही वेळ आहे,असेही बाजवा यांनी म्हटले आहे.
अचानक सुर बदल आश्चर्यकारक
भारताने जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द केले, तेव्हापासून पाकिस्तान भारताविरोधात गरळ ओकत आहे. अमेरिकेने काश्मीर मुद्यावर हस्तक्षेप करावा, यासाठी इम्रान खान सरकारचे प्रयत्न सुरु होते. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीर प्रश्नी हस्तक्षेपाची तयारी सुद्धा दाखवली होती. मात्र आता पाकिस्तानचा सूर अचानक कसा नरमला ही आश्चर्याची बाब आहे.
राज्यात १५ फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरू होणार