23.2 C
Latur
Wednesday, June 16, 2021
Homeआंतरराष्ट्रीयहमासच्या दहशतवाद्यांना पाककडून प्रशिक्षण

हमासच्या दहशतवाद्यांना पाककडून प्रशिक्षण

एकमत ऑनलाईन

इस्लामाबाद : भारतामध्ये अशांततता निर्माण करण्यासाठी दहशतवाद्यांना सर्व प्रकारची मदत करणाºया पाकिस्तान सैन्याने आता आणखी एका देशात अशांतता निर्माण करण्यासाठी उद्योग सुरू केले आहेत. पश्चिम आशियातील अशांत प्रदेश असलेल्या गाझा पट्टीमध्ये सक्रीय असलेल्या हमासच्या दहशतवाद्यांना इस्रायलविरुद्ध लढण्यासाठी पाकिस्तान सैन्य मदत करत आहे. पाकिस्तानच्या वरिष्ठ खासदाराने केलेल्या आरोपामुळे इम्रान खान सरकारची पोलखोल झाली आहे.

पाकिस्तानमधील वरिष्ठ खासदार राजा जफर उल हक यांनी हा आरोप केला आहे. मी टयूनेशियामध्ये गेलो होतो त्यावेळी अबू जिहाद (खलीद अल वजीर) हे पॅल्टेस्टाईन नेते जिवंत होते. त्यांनी मला ही माहिती दिली. इस्रायल विरुद्ध संघर्ष झाला तर त्यांच्या विरोधात लढणाºया बहुतेकांनी पाकिस्तानमध्ये लष्करी प्रशिक्षण घेतलेले असते, हा प्रकार अजूनही सुरु आहे. अबू जिहाद हे गाझा परिसरातील फतह पक्षाचे सहसंस्थापक होते. पाकिस्तान सेनेच्या स्पेशल युनिटची एक बटालियन हे ट्रेनिंग सेंटर चालवण्यासाठी गाझामध्ये तैनात आहे, असा दावा देखील जफर यांनी केला आहे.

ताडपत्रीची चोरी; सुवेंदू अधिकारीविरूध्द गुन्हा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या