29.9 C
Latur
Tuesday, March 21, 2023
Homeआंतरराष्ट्रीयपाक नागरिकांना मोदीसारखे पीएम हवे

पाक नागरिकांना मोदीसारखे पीएम हवे

एकमत ऑनलाईन

इस्लामाबाद : पाकिस्तानी यूट्यूबर सना अमजद यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात एक पाकिस्तानी व्यक्ती भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुक्तकंठाने प्रशंसा करताना व आपले पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचा खरपूस समाचार घेताना दिसून येत आहे.

हा व्यक्ती म्हणतो नरेंद्र मोदी पाकिस्तानचे पंतप्रधान असते तर तेथील जनतेलाही माफक दरात जीवनावश्यक वस्तू मिळाल्या असत्या. सनाने यावेळी या व्यक्तीला पाकिस्तान से जिंदा भागो चाहे इंडिया चले जाओ या ना-याविषयी विचारले. त्यावर तो व्यक्ती म्हणाला मी पाकिस्तानात जन्मलो नसतो तर फार चांगले झाले असते. देशाची फाळणी झाली नसती तर आपल्यालाही माफक दरात जीवनावश्यक वस्तू मिळाल्या असत्या.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या