25.4 C
Latur
Monday, March 1, 2021
Home आंतरराष्ट्रीय पाकिस्तानचे विमान मलेशियाकडून जप्त

पाकिस्तानचे विमान मलेशियाकडून जप्त

एकमत ऑनलाईन

इस्लामाबाद : भारताशी वैर कायम ठेवण्याच्या नादात विकासाचा बट्ट्याबोळ उडालेल्या पाकिस्तानची मित्र देश मलेशियानेही मोठी फजिती व अपमान केला आहे. मलेशियाने पाकिस्तानची सरकारी विमान कंपनी पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सच्या बोईंग ७७७ या प्रवाशी विमानाला जप्त केले आहे. या विमानाचे भाडे थकवण्यात आल्यामुळे मलेशियाने ही कारवाई केली. कारवाई करताना विमानात बसलेल्या प्रवाशांना तसेच कर्मचा-यांनाही अपमानकारक पद्धतीने खाली उतरवण्यात आले. मित्र व मुस्लिम देश म्हणवणा-या मलेशियाकडूनही एवढा मोठा अपमान झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये इम्रानखान सरकारवर टीका सुरू आहे.

पाकिस्तानमधील डेली टाइम्सने याबाबत वृत्त दिले आहे. पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाइन्सच्या ताफ्यात एकूण १२ बोईंग ७७७ ही विमाने आहेत. या विमानांना वेगवेगळया कंपन्यांकडून वेळोवेळी ड्राय लीजवर घेण्यात आले आहे. मलेशियाने जप्त केलेले विमानदेखील भाडे तत्वावर घेण्यात आले होते. भाडे करारातील अटीनुसार पैसे न दिल्यामुळे या विमानाला क्वालालंपूरमध्ये जप्त करण्यात आले. विमानातील कर्मचारी आणि प्रवाशांचा अपमान करून त्यांना उतरवण्यात आले. मलेशियाने ही धडक कारवाई करण्याआधी सौदी अरेबियाने ही कर्जाची रक्कम फेडण्यासाठी पाकिस्तानकडे तगादा लावला आहे. त्यामुळे आता पाकिस्तानकडून ड्रायलीजवर उडविण्यात येत असलेल्या विमानांवर कोणता देश कधी जप्तीची कारवाई करेल याचा भरवसा राहिलेला नाही.

ही एकतर्फी कारवाई :पाकिस्तानची रडारड
पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सने मलेशियाच्या कारवाईबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. स्थानिक कोर्टाच्या आदेशाने हे विमान ताब्यात घेण्यात आले असून ही एकतर्फी कारवाई असल्याचे म्हटले आहे. दोन्ही पक्षकारांमध्ये ब्रिटन कोर्टात सुनावणी सुरू असून मलेशियाने केलेली कारवाई निंदनीय आहे. पाकिस्तान सरकारनेही या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी करण्यात आली आहे.

राम मंदिरासाठी पहिले दान राष्ट्रपतींकडून!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या