37.6 C
Latur
Monday, April 19, 2021
Homeआंतरराष्ट्रीयभारतीय हद्दीतून पाक पंतप्रधानांना उड्डाणाची परवानगी

भारतीय हद्दीतून पाक पंतप्रधानांना उड्डाणाची परवानगी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान श्रीलंका दौ-यावर जाणार आहेत. त्यासाठी पंतप्रधान इम्रान खान यांना भारतीय हवाई क्षेत्रातून उड्डाण करण्याची परवानगी भारताकडून देण्यात आली आहे. इम्रान खान प्रथमच श्रीलंका दौ-यावर जाणार असून, यावेळी त्यांचे विमान भारतीय हवाई क्षेत्रातून उड्डाण करेल, अशी माहिती देण्यात आली आहे.

एका वृत्तसंस्थेकडून मिळालेल्या माहितीनुसार, २३ फेब्रुवारी रोजी इम्रान खान श्रीलंका दौ-यावर जाणार आहेत. यावेळी भारतीय हवाई क्षेत्रातून त्यांचे विमान जाणार असल्याने त्यासाठी भारताकडून परवानगी देण्यात आली आहे. यामुळे पंतप्रधान इम्रान खान यांच्या श्रीलंका दौ-यातील अडथळा दूर झाल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, सन २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाकिस्तानने हवाई क्षेत्र वापरण्यासाठी परवानगी नाकारली होती.

अमेरिका आणि सौदी अरेबिया दौ-यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार असताना पाकिस्तानने आडमुठेपणा करत हवाई क्षेत्र वापरण्यास मनाई केली होती. काश्मीरमध्ये मानवाधिकार हक्कांचे उल्लंघन होत असल्याची सबब पाकिस्तानने दिली होती.

शेणापासून स्वस्त इंधन निर्मिती करा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,477FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या