24.2 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeआंतरराष्ट्रीयपाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकचा हवाई तळ

पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकचा हवाई तळ

एकमत ऑनलाईन

इस्लामाबाद : पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तान लष्करी हवाई तळ उभारत असल्याचे उपग्रह छायाचित्रातून स्पष्ट झाले आहे़ या तळाचा वापर भारतविरोधी कारवायांसाठी केला जाण्याची शक्यता आहे़ भारताविरोधात युद्ध झाल्यास त्याची पूर्वतयारी म्हणून हा हवाई तळ बनवला जात असल्याची चर्चा आहे.

पाकव्याप्त काश्मीरमधील स्कार्दू भागात हा हवाई तळ बनवला जात असल्याचे ओपन सोर्स इंटेलिजेंस एनॉलिस्टने दावा केला आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील स्कार्दूमध्ये पाकिस्तान या हवाई तळाचे विशेष महत्त्व असून भारताची चिंता वाढवणारी बाब आहे. या हवाई तळापासून श्रीनगर आणि लेह फक्त २०० किमी दूर आहेत. या हवाई तळावरून उड्डाण केल्यानंतर पाकिस्तान हवाई दल अवघ्या पाच मिनिटांत भारतात प्रवेश करू शकतात.

Read More  ९ मे नंतर पाकिस्तान लॉकडाऊनमध्ये शिथिलता -पंतप्रधान इम्रान खान

स्कार्दू येथील नवीन हवाई तळावर भूमिगत फ्यूल स्टेशन आणि शस्त्रागारही उभारण्यात येणार आहे. या हवाई तळावरून पाकिस्तान चीन-पाक इकॉनॉमिक कॉरिडोअरची देखरेख करू इच्छितो. स्कार्दूमध्ये आधीपासून नागरिकांच्या सोयीसाठी विमानतळ आहे. मात्र, लष्करासाठी, हवाई दलासाठी हवाई तळ उभे करण्याचे काम सुरू आहे. या हवाई तळाचा वापर चीनचे हवाई दलही करू शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. हंदवाडा येथे झालेल्या चकमकीनंतर पाकिस्तान हवाई दलाने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ ‘एफ-१६’ आणि ‘जेएफ-१७’ हे लढाऊ विमान तैनात केले होते. भारत पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक करेल याची भीती पाकिस्तानला आहे. त्यामुळेच सीमेवर पाकिस्तानने गस्त वाढवली आहे.

पाकिस्तानकडून भारताविरोधात कारवाया सुरू आहेत. पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. मागील काही दिवसांत भारतीय जवानांनी काश्मीर खोºयात दहशतवाद्यांविरोधात केलेल्या कारवाईत काही दहशतवादी ठार झाले.

इम्रान खान यांचे ९० टक्के ट्विट भारतविरोधी
सत्तेवर येताच भारताकडे मैत्रीचा हात पुढे करणारे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे ९० टक्के ट्विट्स भारतविरोधी असल्याचे स्पष्ट झाले आहे़ गुप्तचर यंत्रणा आणि संरक्षण संस्थांनी इम्रान खान यांच्या सोशल मीडिया हँडलचे विश्लेषण केले आहे.

Read More  पाकिस्तानमधील करोनाबाधितांची संख्या 20 हजारांवर

भारताने काही महिन्यांपूर्वी जम्मू-काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम ३७० रद्द केले होते़ त्यानंतर त्यांची अनेक ट्विट ही काश्मीरवर असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच त्यांनी भारतीय लष्कराचे बनावट व्हीडीओदेखील शेअर केल्याचे स्पष्ट झाले आहे.बलुचिस्तान असेल, सिंध, खैबर पख्तूनख्वाह, गिलगिट बाल्टीस्तानमध्ये सुरू असलेले आंदोलन असेल किंवा देशावरील आर्थिक संकट असेल, असे अनेक अंतर्गत मुद्दे लपवण्यासाठी इम्रान खान यांच्याकडून सोशल मीडियाद्वारे अशाप्रकारचे आरोप केले जात असल्याचे म्हटले जात आहे.

भारतविरोधी ट्विटसाठी युवकांची भर्ती
डायरेक्टर जनरल आॅफ इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सने महाविद्यालये आणि इतर संस्थांमधील शेकडो तरुणांची, जे ट्विटरवर भारतविरोधी ट्विट करत असतात तसेच ज्यांना स्टायपंडचीही आवश्यकता असते अशा विद्यार्थ्यांना नियुक्त केले असल्याची माहिती भारतातील दहशतवादविरोधी युनिटच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले. ते आपल्या धर्माबद्दल चर्चा करतात आणि त्यासाठी बनावट सोशल मीडिया अकाऊंटचा वापरही करतात. त्या ठिकाणी दरवर्षी इंटर्नशिप प्रोग्राम भरवला जातो आणि देशभक्त सोशल मीडिया वॉरिअर्सना तयार केले जाते. ते लोक भारतविरोधी पोस्ट करतात, अशी माहितीही त्यांनी बोलताना दिली आहे़

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या