25.4 C
Latur
Monday, March 1, 2021
Home आंतरराष्ट्रीय भारताकडून लस मिळविण्याचा पाकचा प्रयत्न

भारताकडून लस मिळविण्याचा पाकचा प्रयत्न

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारताने शेजारी देश असणा-या बांगलादेशला कोरोना लसींचे २० लाख डोस पाठवण्याची तयारी सुरु केली आहे. असे असतानाच पाकिस्तानलाही भारतामध्ये निर्माण करण्यात आलेल्या कोरोना लसीची अपेक्षा आहे. भारताशी थेट संवाद साधून किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरील मित्र राष्ट्रांच्या मदतीने भारतात तयार करण्यात आलेली कोरोना लस मिळवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न असल्याचे वृत्त आहे़

बांगलादेशमधील सरकारी अधिका-यांनी बुधवारी म्हणजेच २० जानेवारी रोजी विशेष विमानाने देशामध्ये सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाच्या कोव्हिशिल्ड या लसीचे २० लाख डोस देशामध्ये आणले जाणार असल्याची माहिती दिली आहे. ढाक्यामध्ये हे विमान उतरणार आहे. ढाक्यामधील भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिका-यांच्या हस्ते लसींचा हा साठा बांगलादेशमधील अधिका-यांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

पाकिस्तानमधील ड्रग कंट्रोलर ऑफ पाकिस्तान म्हणजेच डीआरएपीने ऑक्सफर्ड आणि अल्ट्राझेन्काच्या कोरोना लसीच्या आत्पकालीन वापरासाठी परावनागी दिली आहे. त्यानंतर भारतामध्ये निर्माण करण्यात आलेली ही लस मिळवण्यासाठी पाकिस्तानने हलचाली सुरु केल्यात. पाकिस्तानमध्ये पाच लाखांहून अधिक कोरोनाबाधित असून, येथे ११ हजारांहून अधिक जणांना कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जागतिक स्तरावर लसीकरणासाठी स्थापन करण्यात आलेल्या कोव्हॅक्सच्या माध्यमातून भारतीय लस मिळवण्याचा इस्लामाबादचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर कोईलेशन फॉर पॅनडॅमिक प्रिपेडनेस इनोव्हेशन (सीईपीआय) आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या मदतीनेही भारतातील लस पाकिस्तानामध्ये आणता येईल़ या यासंदर्भातील विचार सुरु आहे. कोव्हॅक्सच्या माध्यमातून जगभरातील १९० देशांमधील जागतिक लोकसंख्येच्या २० टक्के लोकांना मोफत लस देण्याचा निर्धार करण्यात आला आहे. यामध्ये पाकिस्तानचाही समावेश आहे. दुस-या तिमाहीमध्ये पाकिस्तानला कोव्हॅक्सच्या माध्यमातून लसींचा पहिला पुरवठा केला जाईल, अशी अपेक्षा आहे.

अरुणाचलमध्ये चीनने वसवले गाव

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या