Tuesday, October 3, 2023

पाकिस्तानचे आरोग्यमंत्री करोनाबाधित

पाकिस्तानमध्ये करोना विषाणूमुळे परिस्थिती गंभीर आणि चिंताजनक होत आहे. वेगाने पसरणाऱ्या करोनाचा संसर्ग सर्वसामान्य जनतेसह केंद्रीय मंत्र्यांनाही होत आहे. पाकिस्तानचे आरोग्यमंत्री डॉ जफर मिर्जाही करोना संक्रमित झाले आहेत. आरोग्यमंत्री मिर्जा यांच्या करोनाचा चाचणीचा अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आला. त्यानंतर जफर मिर्जा यांनी स्वत:ला घरातच क्वारइंटाइन केलं आहे. याआधी शुक्रवारी परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरैशी यांना करोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आलं होतं. दोन्ही नेत्यांच्या संपर्कातील लोकांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे.

सोमवारी मिर्जा यांनी ट्विटरद्वारे करोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली. ते म्हणाले की, ‘गेल्या काही दिवसांपासून मला करोनाची लक्षणे जाणवली होती. त्यावेळी योग्य ती काळजीही घेतली. करोनाची चाचणी केल्यानंतर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे मी स्वत: ला होम क्वारंटाइन करत आहे.’ यावेळी मिर्जा यांनी करोना लढ्यातील आपल्या सहकाऱ्यांचं कौतुक केलं.

Read More  औरंगाबादेत आज 77 रुग्णांची वाढ

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या