36.3 C
Latur
Saturday, May 28, 2022
Homeआंतरराष्ट्रीयपाकिस्तानचा रुपया घसरला, श्रीलंकेच्या वाटेवर

पाकिस्तानचा रुपया घसरला, श्रीलंकेच्या वाटेवर

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : पाकिस्तानी रुपयाचे मूल्य डॉलर्सच्या तुलनेत आत्तापर्यंतच्या सर्वात खालच्या स्तरावर येऊन पोहचले आहे. एका डॉलरसाठी पाकिस्तानला १८८.३५ रुपये मोजावे लागत आहेत. श्रीलंकेप्रमाणे पाकिस्तानच्या चलनाचे मुल्य डॉलरच्या समोर मोठ्या प्रमाणात घसरले आहे. बुधवारी सकाळी ८२ पैशांनी पाकिस्तानी रुपया डॉलरच्या तुलनेत घसरला.

पाकिस्तानमधील अस्थिर राजकीय परिस्थिती, ढासळलेली अर्थव्यवस्था, महागाई, इंधनाच्या वाढत्या किंमती यामुळे पाकिस्तानचे पेकाट मोडले आहे. असे असतांना पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे मदत मागितली. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही ६ अब्ज डॉलर्स देण्याची तयारी दर्शवली होती. यासाठी काही प्रमाणात आर्थिक शिस्त पाळण्याच्या सूचना पाकिस्तानला केल्या होत्या. विशेषत: इंधन आणि वीजेवर असलेली सवलत मोठ्या प्रमाणात कमी करण्यास सांगितले होते. दरम्यान पाकिस्तामध्ये सत्तांतर झाल्यावरही हे बदल होऊ शकले नाहीत. यामुळे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही पाकिस्तानला अपेक्षित असलेला अर्थपुरवठा थांबवला. यामुळे पाकिस्तानच्या अडचणीत भर पडली आहे.

पाकिस्तानमधील विदेशी चलन साठाही कमी झाला असून पुढील काही दिवस काढता येतील अशी परिस्थिती आहे. त्यात आता अन्नधान्याचे संकटही पाकिस्तानसमोर येऊन ठेपले आहे. गहूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने आणखी एक अडचणीचा डोंगर पाकिस्तानसमोर उभा राहिला आहे. श्रीलंकेप्रमाणे पाकिस्तानातही राजकीय अराजक निर्माण होण्याची शक्यता आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या