23.2 C
Latur
Wednesday, June 16, 2021
Homeआंतरराष्ट्रीयभारतावर पॅलेस्टाइनची नाराजी

भारतावर पॅलेस्टाइनची नाराजी

एकमत ऑनलाईन

जेरूसलेम : पॅलेस्टाइन यांच्यामध्ये सुरु असलेल्या संघर्षाला काही दिवसांपूर्वी युद्धविराम मिळाला. ११ दिवस दोन्ही ठिकाणी युद्धसदृश्य परिस्थिती होती. दरम्यान, संयुक्त राष्ट्र संघाच्या मानवाधिकार समितीत गाझा येथे झालेल्या हिंसाचाराचाबाबत इस्रायलविरुद्ध चौकशी करण्याच्या प्रस्तावावर भारताकडून प्रतिसाद न आल्याने पॅलेस्टाइनने नाराजी दर्शवली आहे. यासंदर्भात पॅलेस्टाइने भारताच्या परराष्ट्रमंर्त्यांना एक पत्र लिहिले आहे. या प्रस्तावाच्या मतदानावेळी उपस्थित न राहून भारताने एक महत्त्वाची संधी गमावली आहे, असे या पत्रात म्हटले आहे.

प्रजासत्ताक भारताने युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काऊन्सिलमध्ये इस्रायलविरोधात चौकशीसाठी आणलेल्या निर्णायक आणि महत्त्वपूर्ण मतदानाच्या ठरावादरम्यान गैरहजर राहून एक महत्त्वाची संधी गमावली. संयुक्त राष्ट्रातर्फे इस्रायलची चौकशी करण्यात येणार होती पण भारत या बैठकीत गैरहजर राहिला, असे रियाद अल-मल्की यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांना लिहिलेल्या पत्र म्हटले आहे.

इस्त्रायलच्याविरोधात आणलेल्या प्रस्तावादरम्यान मतदानावेळी भारत त्या १४ देशांमध्ये होता़ ज्यांनी इस्त्रायल विरोधात मतदान केले नव्हते. भारत मतदानावेळी अनुपस्थित होता. त्यामुळे पॅलेस्टाइने भारताविरोधात नाराजी दर्शवली आहे. २७ मे रोजी जिनिव्हामध्ये झालेल्या या मतदानावेळी २४ सदस्यांनी प्रस्तावाच्या बाजूने तर ९ सदस्यांनी प्रस्तावाविरोधात मतदान केले.

पाटणा एम्समध्ये कोव्हॅक्सिन लसीची मुलांवर चाचणी सुरु

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या