22.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeआंतरराष्ट्रीयक्वाड नेत्यांच्या बैठकीवर दहशतीचे सावट

क्वाड नेत्यांच्या बैठकीवर दहशतीचे सावट

एकमत ऑनलाईन

टोकियो : जपानची राजधानी टोकियो येथे २४ मे रोजी क्वाड नेत्यांची बैठक होणार आहे. बैठकीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन सहभागी होणार आहेत. मात्र, टोकियो मेट्रोपॉलिटन पोलिस विभागाला रशियाच्या युक्रेनवर हल्ल्यामुळे तणावपूर्ण आंतरराष्ट्रीय वातावरणात हल्ले आणि व्यत्यय येण्याची भीती आहे. यामुळे क्वाड नेत्यांच्या कडेकोट सुरक्षेसाठी टोकियोमध्ये सुमारे १८,००० पोलिस अधिकारी तैनात केले जातील.

जपान टाइम्सच्या अहवालात असे सूचित केले आहे की, टोकियोच्या मेट्रोपॉलिटन एक्स्प्रेसवेवर २२ मे पासून तीन दिवस रहदारी निर्बंध लादले जातील. हल्ले आणि व्यत्यय येण्याची भीती असल्यामुळे टोकियो पोलिस दंगल पोलिस आणि सुरक्षा पथके देखील तैनात करणार आहेत.

लष्करी सुरक्षेत वाढ
टोकियो पोलिस ‘सॉफ्ट टार्गेट्स’वरील हल्ल्यांविरुद्ध उपाय देखील कडक करीत आहेत. जे सहसा सरकारी किंवा लष्करी सुविधांपेक्षा कमी सुरक्षित असतात. परंतु, मोठ्या प्रमाणात गर्दी असू शकते. जसे की नेत्यांची निवासस्थाने, टोकियो स्टेशन आणि टोकियो विमानतळ.

सायबर हल्ल्याचाही धोका
जपानी माध्यमांमध्ये असेही वृत्त आहे की, नेत्यांना हल्ले, मीटिंगमध्ये हस्तक्षेप आणि सायबर हल्ल्याचा धोका आहे. मात्र, याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. ऑस्ट्रेलियामध्ये २१ मे रोजी सार्वत्रिक निवडणुका आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या वतीने क्वाड समिटमध्ये कोण सहभागी होणार हे स्पष्ट नाही.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या