22.5 C
Latur
Saturday, February 27, 2021
Home आंतरराष्ट्रीय फाळणी नेहरू नव्हे जिन्नामुळे ! पाकिस्तानी लेखकाचा दावा

फाळणी नेहरू नव्हे जिन्नामुळे ! पाकिस्तानी लेखकाचा दावा

एकमत ऑनलाईन

इस्लामाबाद: भारताच्या फाळणीसाठी पंडित नेहरुच जबाबदार होते, असे अनेक उजव्या विचारसरणीचे लोक सांगतात. नेहरुंना देशाचे पहिले पंतप्रधान व्हायचे होते मग त्यासाठी फाळणी झाली तरी चालेल असा त्यांचा हट्ट होता, असे त्यांचे मत असते. मात्र, फाळणीसाठी मोहम्मद अली जिना यांचा हट्टीपणा कारणीभूत असल्याचा दावा पाकिस्तानी लेखक इश्तियाक अहमद यांनी केला आहे.

इश्तियाक अहमद यांनी आपल्या ‘जिन्ना; हीज सक्सेस अ‍ॅण्ड फेलर अ‍ॅण्ड रोल इन हिस्ट्री’ या पुस्तकात हा दावा केला आहे. फाळणी होऊ नये यासाठी महात्मा गांधी, पंडित नेहरू आणि काँग्रेस पक्ष आग्रही होते. मात्र, मुस्लिम लीगचे नेते जिना फाळणीवर अडून बसले होते. जिना यांनी काँग्रेसला हिंदूचा पक्ष, तर महात्मा गांधी यांना ‘हुकूमशहा’ असल्याचे सिद्ध करण्याचा खूप प्रयत्न केला.

जिना १९३७ नंतर मुस्लिम राष्ट्रवादी झाले. हिंदू आणि मुस्लिमांसाठी दोन राष्ट्र असल्याचे ते मानत होते. हे दोन्ही देश कधीही एकत्र राहू शकत नाही असे त्यांना वाटत होते. लखनऊमध्ये १९३६ मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जमिनदारी व्यवस्था नष्ट करण्याबाबत भाषण केले होते. त्यांच्या या भाषणानंतर मुस्लिम जमिनदारांना मोठा धक्का बसला होता. त्याचा फायदाही जिना यांनी मुस्लिमांना आपल्याकडे वळवण्यासाठी केला होता असा दावा इश्तियाक यांनी केला आहे.

ब्रिटनकडूनही चिथावणी
अखंड भारत हा सोव्हिएत युनियनच्या नेतृत्वातील गटात सहभागी होईल अशी भीती ब्रिटीशांना होती, त्यामुळे त्यांनीही जिनांना चिथावणी दिली. जिना यांना शीख आणि द्राविडींसाठीही वेगळे राष्ट्र हवे होते, असेही इश्तियाक यांनी सांगितले आहे.

मी ड्रग्जच्या आहारी गेले होते; कंगना राणौतचा व्हिडीओ होतोय व्हायरल

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,434FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या