26.6 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeआंतरराष्ट्रीयलडाखमध्ये चीनी विमानांची गस्त

लडाखमध्ये चीनी विमानांची गस्त

एकमत ऑनलाईन

लडाख : भारत-चीनदरम्यान अद्यापही तणावाचे ढग दूर झालेले नाहीत. अधुनमधून भारताला डिवचण्याची खुमखुमी चीनला येत असते. आता पुन्हा एकदा याची पुनरावृत्ती पहायला मिळाली.

चीनच्या लष्कराचे एक विमान लडाखजवळील अ‍ॅक्च्युअल लाईन ऑफ कन्ट्रोलच्या जवळ घिरट्या घालत असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, या घटनेची भारताने गंभीर दखल घेतली असून चीनला अशा घटना भविष्यात पुन्हा होऊ नयेत याबाबत काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

यापूर्वी सन २०२० मध्ये लडाखच्या गलवान व्हॅलीमध्ये भारतीय आणि चीनी सैनिकांमध्ये मोठा संघर्ष झाला होता. यामध्ये चीनचे ४० तर भारताचे २० सैनिक मारले गेले होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या