22.1 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeआंतरराष्ट्रीयएच-१बी व्हिसा नियम कायमचे रद्द

एच-१बी व्हिसा नियम कायमचे रद्द

एकमत ऑनलाईन

वॉशिंग्टन : माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात केलेले एच-१ बी व्हिसा नियमांमधील बदल अमेरिकेच्या फेडरल न्यायालयाच्या न्यायाधीशांनी बुधवारी कायमचे रद्द केले आहेत. ट्रम्प सरकारने व्हिसासंदर्भात नवीन नियम बनवून अमेरिकन कंपन्यांना स्वस्त परदेशी कर्मचा-यांऐवजी स्थानिक कर्मचारी घेण्यास भाग पाडले होते.

कायदेशीर बातम्या आणि इतर वृत्त माध्यमांसाठी देशव्यापी अमेरिकन वृत्तसेवा, कोर्टहाऊस न्यूज सर्व्हिसचे निकोलस आयविनो यांनी म्हटले आहे की, एच-१बी व्हिसावर घातलेले निर्बंध बेकायदेशीर असल्याचे आढळले आहे. कारण ते होमलँड सिक्युरिटी विभागाचे कार्यकारी सचिव यांनी जारी केले होते आणि त्यांची नियुक्तीच बेकायदेशीरपणे करण्यात आली होती.

ट्रम्प प्रशासनाची एच-१ बी व्हिसा देण्यासाठी लॉटरी प्रणाली रँडम अर्जदारांची निवड करते, अशी तक्रार व्यापारी आणि विद्यापीठांनी केली असल्यामुळे अत्यंत कुशल आणि कर्तव्यदक्ष परदेशी कामगार आणि विद्यार्थ्यांची भरती करणे कठीण झाले आहे. ट्रम्प प्रशासनाचा हा नियम आयटी कर्मचारी, डॉक्टर, लेखापाल, प्राध्यापक, शास्त्रज्ञ आणि आर्किटेक्ट यांना लागू होता. अमेरिकेच्या होमलँड सिक्युरिटी आणि लेबर विभागाने ऑक्टोबर २०२० मध्ये हे नवीन नियम जारी करून एच-१बी व्हिसा कार्यक्रमात सुधारणा केली होती.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या