30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeआंतरराष्ट्रीयचीनमध्ये देशी लसीच्या वापराला परवानगी

चीनमध्ये देशी लसीच्या वापराला परवानगी

एकमत ऑनलाईन

बीजिंग : चीनमध्ये सिनोफार्म या औषध कंपनीने बनवलेल्या कोविड-१९ विरोधी लसीच्या वापराला सशर्त परवानगी देण्यात आली आहे. या संदर्भातील अधिकृत घोषणा आज करण्यात आली. या लसीची परिणामकारकता ७९.३४ टक्के आणि अ‍ॅन्टीबॉडी-पॉझिटिव्ह रुपांतरणाचा दर ९९.५२ टक्­के असल्याचे तिस-या टप्प्यातील वैद्यकीय चाचणीचा हंगामी निष्कर्शात दिसून आल्याचे सिनोफार्म कंपनीच्यावतीने जाहीर करण्यात आले. त्याच्या दुस-याच दिवशी या लसीच्या वापराला परवानगी देण्यात आली.

बीजिंग बायोलॉजिकल प्रॉडक्­टस इस्टिट्युटने सिनोफार्मची उपकंपनी असलेल्या चायना नॅशनल बायोटेक ग्रुपच्या सहकार्याने ही लस विकसित केली आहे. चीनच्या राष्ट्रीय वैद्यकीय उत्पादा प्राधिकरणाकडून या लसीला अधिकृत मान्यता देण्यात आली आहे, असे राष्ट्रीय वैद्यकीय उत्पादनांचे उपप्रमुख चेन शिफेई, यांनी सांगितले. चीनमध्ये आपत्कालीन वापरासाठी सिनोफार्मची निष्क्रिय लस सुमारे दहा दशलक्ष लोकांना दिली गेली आहे आणि त्यापैकी कोणावरही विपरीत परिणाम आढळलेले नाहीत. सुमारे १० पेक्षा जास्त देशांमधील ७०,००० स्वयंसेवकांनी तिस-या टप्प्याच्या वैद्यकीय चाचण्यांमध्ये भाग घेतला आहे़

 

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘खिसा’ची निवड

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या