21.4 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeआंतरराष्ट्रीयपाकमध्ये पेट्रोल ११८ रुपयांवर

पाकमध्ये पेट्रोल ११८ रुपयांवर

एकमत ऑनलाईन

इस्लामाबाद : पाकिस्तानची आर्थिक स्थिती ढासळत चालली असून, आता यावर उपाय म्हणून पेट्रोलशिवाय अन्न धान्याच्याकिंमतीतही वाढ केली आहे. यामध्ये गहू, साखर, तूप यांचेही दर वाढवले आहेत. मंत्रिमंडळाच्या समितीने शुक्रवारी पाकिस्तानच्या युटिलिटी स्टोअर्स कार्पोरेशनमध्ये साखर, गहू, तूप यांच्या दरांमध्ये वाढ करण्यास मंजुरी दिली.

पाकिस्तानमध्ये साखरेचा दर आता एक किलोला ६५ रुपयांवरून ८५ रुपये इतका झाला आहे. तर तूप १७० रुपयांवरून २६० रुपये प्रति किलो इतके झाले आहे. तर २० किलो गव्हाची बॅग ८५० रुपयांवरून ९५० रुपये इतकी झाली आहे. युटिलिटी स्टोअर्स कार्पोरेशनकडून देण्यात येणा-या अनुदानाचीकिंमती आणि बाजारातील किंमती यामध्ये अंतर वाढले आहे. अनुदानात समतोल साधण्यासाठी तीन जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढवण्यास मंजुरी दिली गेली.

२४ तासांत ३८,०७९ नवे रुग्ण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या