24.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeआंतरराष्ट्रीयपाकिस्तानात पेट्रोल दरवाढीचा भडका

पाकिस्तानात पेट्रोल दरवाढीचा भडका

एकमत ऑनलाईन

इस्लामाबाद : पाकिस्तानात इंधन दरवाढीचा मोठा भडका उडाला आहे. पाकिस्तान सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रतीलिटर ३० रुपयांनी वाढवले आहेत. इस्लामाबादमध्ये एक लीटर पेट्रोलची किंमत १७९ रुपये ८६ पैसे झाली असून डिझेलसाठी १७४ रुपये १५ पैसे मोजावे लागत आहेत. याशिवाय केरोसिनच्या किंमतीतही ३० रुपयांनी वाढ झाली असून दर १५५ रुपये ५६ पैसे झाला आहे. अशातच विरोधी पक्षनेते इम्रान खान यांच्याकडून सरकारवर टीका करताना भारतात मोदी सरकारने केलेल्या इंधनदरकपातीचे कौतुक करण्यात आले आहे.

इम्रान खान यांनी वाढत्या इंधनाच्या दरांवरुन टीका करताना म्हटले आहे की, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत २० टक्क्यांची वाढ करत देशाने आयात केलेल्या सरकारच्या अधीनतेसाठी किंमत मोजायला सुरुवात केली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी ऐतिहासिक वाढ आहे. आपल्या अकार्यक्षम आणि असंवेदनशील सरकारने रशियाकडून ३० टक्के स्वस्त तेलासाठी केलेल्या कराराचा पाठपुरावा केला नाही.

पुढच्या ट्वीटमध्ये इम्रान खान यांनी भारताने रशियाकडून स्वस्तात तेल खरेदी केल्याच्या धोरणाचे कौतुक केले आहे. ते म्हणाले की याउलट अमेरिकेचा धोरणात्मक सहकारी असलेल्या भारताने रशियाकडून स्वस्तात तेल खरेदी करत इंधनाच्या किंमती २५ रुपयांनी कमी केल्या आहेत. आता आपल्या देशाला बदमाशांच्या हातून महागाईचा आणखी एक मोठा डोस सहन करावा लागणार आहे.

पाकिस्तानचे अर्थमंत्री मिफ्ताह इस्माइल यांनी गुरुवारी सरकारने पेट्रोलियम उत्पादनांच्या किंमती ३० रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेतला असल्याची घोषणा केली. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसोबत चर्चा फिस्टकल्यानंतर ही इंधन दरवाढ करण्यात आली. सरकारकडे किंमती वाढवण्याशिवाय अन्य कोणताही पर्याय नसल्याचे इस्माइल यांनी सांगितले नव्या दरांमध्ये डिझेलवर आम्हाला प्रतीलिटर ५६ रुपयांचे नुकसान सहन करावे लागत असल्याचेही ते म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या