25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeआंतरराष्ट्रीयफायझर भारताला ७ कोटी डॉलर्सची औषधे पाठवणार

फायझर भारताला ७ कोटी डॉलर्सची औषधे पाठवणार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : अमेरिकेच्या फायझर या कंपनीने भारतासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. फायझर भारतासाठी तब्बल ७ कोटी अमेरिकन डॉलर्सच्या औषधे भारतात पाठवणार आहे. त्यामुळे कोरोना विषाणूचा सामना करण्यास भारताला मदत मिळणार आहे. याशिवाय लसीसंदर्भातही कंपनी भारताशी चर्चा करत असल्याची माहिती समोर आली आहे.

कोरोना विषाणूच्या दुस-या लाटेचा मोठा फटका बसलेल्या भारताला संकटाचा सामना करण्यासाठी अमेरिकन फार्मा कंपनी फायझरने मदतीचा हात पुढे केला आहे. कंपनी भारताला ७ कोटी डॉलर्सची औषधे पाठवणार आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अलबर्ट बॉरला यांनी ही माहिती दिली. याशिवाय आपल्या लसीला भारतात लवकरात लवकर परवानगी देण्यासाठीही सरकारशी चर्चा सुरू असल्याची माहिती बॉरला यांनी लिंक्डीनवरून दिली.

महिनाभरापूर्वीच अर्ज सादर
आमचा अर्ज महिन्याभरापूर्वीच सादर करण्यात आला आहे. परंतु लसीची भारतात नोंदणी झाली नाही, असेही त्यांनी नमूद केले. आमची भारत सरकारबरोबर चर्चा सुरू आहे. तसेच, याला मंजुरी मिळाल्यास देशात याच्या वापरास सुरूवात करता येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पश्चिम बंगालमध्ये पत्रकारही असतील कोविड वॉरियर्स

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या