23.1 C
Latur
Monday, August 2, 2021
Homeआंतरराष्ट्रीयब्रिटनमध्ये मुलांसाठी फायझरच्या लसीला मंजूरी

ब्रिटनमध्ये मुलांसाठी फायझरच्या लसीला मंजूरी

एकमत ऑनलाईन

लंडन : कोरोनाने जगात कहर केला आहे. अनेक देशात कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे संकेत तज्ज्ञांनी दिले आहे. या लाटेत लहान मुले सर्वाधिक बाधित होतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे लहान मुलांच्या लसीकरणाचा देखील विचार करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर ब्रिटनमध्ये १२ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांसाठी फायझर लसीला मंजूरी मिळाली आहे.

ब्रिटनने १२ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांसाठी फायझर बायोएनटेक बनवलेल्या कोरोना लस वापरण्यास मान्यता दिली आहे. ब्रिटनच्या ड्रग रेग्युलेटरने शुक्रवारी सांगितले की, सखोल आढावा घेतल्यानंतर असे आढळले की सदर लस १२-१५ वर्षांच्या किशोरवयीन मुलांसाठी सुरक्षित आहे. अमेरिकेने आणि युरोपियन संघानेही फायझरच्या लशीसाठी असेच मूल्यांकन केले होते.

मेडिसिन अँड हेल्थकेअर प्रॉडक्ट्स रेग्युलेटरी एजन्सीचे प्रमुख जून रेने म्हणाले, आम्ही १२ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांमधील क्लिनिकल चाचण्यांविषयीच्या डेटाचे काळजीपूर्वक परीक्षण केले आणि लस सुरक्षित तसेच उपयुक्त असल्याचे आम्हाला आढळले. या व्यतिरिक्त या लसीचे बरेच फायदे आहेत आणि कोणताही धोका नाही.

मानवत मंडळात २८ मिलिमिटर पावसाची नोंद, नाल्यांना पूर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या