25 C
Latur
Monday, May 17, 2021
Homeआंतरराष्ट्रीयइंग्लंडमध्ये फायझरचा ‘डेटा हॅक’; इंटरपोलचा इशारा ठरला खरा

इंग्लंडमध्ये फायझरचा ‘डेटा हॅक’; इंटरपोलचा इशारा ठरला खरा

एकमत ऑनलाईन

लंडन : जगभरात कोरोनावरील लसींच्या चाचण्या पुर्णत्वाच्या दिशेने आहेत. इंग्लंडमध्ये तर फायझर या औषध कंपनीने बनविलेली लस देण्यास सुरुवातही झाली आहे. मात्र अशातच एक धक्कादायक बातमी आली असून फायझरच्या लसीचा डेटा इंग्लंडमध्ये हॅक झाल्याचे समजते आहे.

नुकताच इंटरपोलने (जागतिक पोलिस यंत्रणा)सर्व राष्टÑांना लसीबाबतचा डेटा हॅक होऊ शकतो असा इशारा दिला होता. इंटरपोलचा हा इशारा ब्रिटनमध्ये घडलेल्या या घटनेनंतर खरा ठरला आहे. फायझर आणि बायोएनटेकने ज्या सरकारी संस्था युरोपिअन मेडिसीन एजन्सीला (इएमए) कोरोना लसीसाठी मंजुरीचा अर्ज पाठविला होता, तेथूनच हा डेटा लीक झाल्याचे सांगण्यात येत आहे. रॉयटरने हे वृत्त दिले आहे.

दुसरीकडे फायझर आणि बायोएनटेकने मात्र याबाबत साशंकता व्यक्त करीत आमच्या खासगी डेटापर्यंत कोणी पोचल्याचे आढळले नसून सायबर हल्ल्याची समिक्षा करण्यासाठी अधिक वेळ लागेल, असे ‘इएमए’नेही म्हटल्याचे सांगितले आहे.

आधारकार्डाव्दारे नेपाळींची घुसखोरी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,496FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या