ब्राझिलिया : ब्राझीलमध्ये झालेल्या विमान अपघातात पायलट आणि सहवैमानिकांसह १४ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये ब्राझील आणि अमेरिकेतील प्रवाशांचा समावेश आहे. सर्व प्रवासी बार्सिलोनामध्ये मासेमारीसाठी जात होते.
हा अपघात भारतीय वेळेनुसार रात्री ११.३० वाजता अॅमेझॉनासची राजधानी मानौसपासून ४०० किमी अंतरावर असलेल्या बार्सेलोस प्रांतात घडला. अपघाताच्या वेळी मुसळधार पाऊस पडत होता. खराब हवामानामुळे विमान उतरवण्यासाठी लँडिंग स्ट्रिपचा अंदाज आला नाही.