26.5 C
Latur
Friday, December 9, 2022
Homeआंतरराष्ट्रीयटांझानियामध्ये तलावात कोसळले विमान

टांझानियामध्ये तलावात कोसळले विमान

एकमत ऑनलाईन

डोडोमा : टांझानियात रविवारी ४९ प्रवाशांना घेऊन निघालेले विमान व्हिक्टोरिया तलावात कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. एएफपी वृत्तसंस्थेने पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार तलावात कोसळलेले विमान प्रिसिजन एअरलाईन्सचे आहे. हे विमान टांझानियाच्या कागेरा भागातील बुकोबा येथील व्हिक्टोरिया तलावात कोसळले आहे. सध्या युद्धपातळीवर बचाव कार्य हाती घेण्यात आले आहे.

विमानतळापासून अवघ्या १०० मीटर अंतरावर ही दुर्घटना घडली, असे प्रादेशिक पोलिस कमांडर विल्यम मवाम्पघले यांनी बुकोबा विमानतळावर पत्रकारांना सांगितले. विमानातील प्रवाशांच्या संख्येबद्दल कोणतीही माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. मात्र या विमानातून ४९ जण प्रवास करत होते, असे सांगितले जात आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या