23 C
Latur
Friday, August 12, 2022
Homeआंतरराष्ट्रीयब्रिटनमध्येही राजकीय भूकंप पंतप्रधान जॉन्सन राजीनामा देणार?

ब्रिटनमध्येही राजकीय भूकंप पंतप्रधान जॉन्सन राजीनामा देणार?

एकमत ऑनलाईन

लंडन : महाराष्ट्रापाठोपाठ आता ब्रिटनमध्येही राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ब्रिटनचे अर्थमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर आता ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सनदेखील राजीनामा देऊ शकतात असे सांगितले जात आहे.

देशातील २ मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यावरील दबाव वाढला असून, जॉन्सन यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला आहे.

ऋषी सुनक यांचा राजीनामा
ब्रिटनचे अर्थमंत्री ऋषी सुनक यांनी मंगळवारी राजीनामा दिला. देशाच्या हितासाठी कारभार करण्याच्या बोरिस जॉन्सन यांच्या क्षमतेवरील अनेक खासदारांचा आणि जनतेचा विश्वास उडाला आहे, असे सुनक यांचे मत आहे. सुनक यांनी ट्विट करून लिहिले की, सरकार योग्य आणि सक्षम पद्धतीने चालवावे अशी जनतेची इच्छा आहे. सरकारमधून बाहेर पडल्याचे दु:ख होत असल्याचेही सुनक यांनी ट्वीटमध्ये नमुद केले.

आरोग्य मंत्र्याचा राजीनामा
ब्रिटनचे आरोग्य मंत्री साजिद जाविद यांनी राजीनाम्यासंबंधी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, तुमच्या नेतृत्वाखाली परिस्थिती बदलणे कठीण आहे याबद्दल मला खेद वाटतो. खासदार ख्रिस पिंचर यांच्यावर दारूच्या नशेत गैरवर्तन केल्याचा आरोप होता. याप्रकरणी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.

पंतप्रधान बोरिस जॉन्सनचा राजीनामा?
मागील महिन्यात ब्रिटनमध्ये सत्तेत असलेल्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या ५० हून अधिक खासदारांनी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र, त्यावेळी पंतप्रधान बोरिस जॉन्सन विश्वासदर्शक ठराव जिंकण्यात यशस्वी ठरले. सभागृहात २११ पैकी १४८ मते बोरिस जॉन्सन यांच्या बाजूने आली.

पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यावर कोरोना महामारीत लॉकडाऊन दरम्यान पार्टी आयोजित केल्याचा आरोप करण्यात आला होता. ते प्रकरण निवळत नाही तोच आता जॉन्सन सरकारमधील दोन मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर सरकारसाठी धोका निर्माण झाला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या