24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeआंतरराष्ट्रीयएससीओ समिटमध्ये मोदींच्या फोटोवरून राजकारण

एससीओ समिटमध्ये मोदींच्या फोटोवरून राजकारण

एकमत ऑनलाईन

समरकंद : उझबेकिस्तानमधील समरकंद येथे सुरू झालेल्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन(एससीओ) शिखर परिषदेतील मोदींच्या छायाचित्रावरून भारतात राजकारण सुरू झाले आहे. शिखर परिषदेपूर्वी सर्व राज्यप्रमुखांसोबत प्रसिद्ध झालेल्या पंतप्रधान मोदींच्या ग्रुप फोटोवर काँग्रेसने निशाणा साधला आहे.

परिषदेपूर्वी काढण्यात आलेल्या छायाचित्रात एका कोप-यात पीएम मोदी तर दुस-या बाजूला पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ दिसत आहेत. या फोटोवर काँग्रेस नेते गौरव गोगोई यांनी ट्वीट करत खिल्ली उडवली आहे. यामध्ये त्यांनी पीएम मोदी आणि परराष्ट्र मंत्रालयाची खराब सुरुवात असल्याचे म्हटले आहे. मोदी एका बाजूला, तर दुसरीकडे पाकिस्तान असून, मला लाल डोळ्यांऐवजी बंद डोळे दिसत असल्याचे म्हटले आहे.

भाजपचे जोरदार प्रत्युत्तर
काँग्रेस नेत्याच्या या ट्विटनंतर भारतीय जनता पक्षानेही प्रत्युत्तर दिले आहे. भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी काही वर्षांपूर्वी पार पडलेल्या जी-२० बैठकीचे छायाचित्र शेअर केले आहे. ज्यामध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग दुस-या रांगेत डोके खाली करून दिसत आहेत. काँग्रेसवर हल्लाबोल करताना ते म्हणाले की, यजमान देशाने ठरवून दिलेल्या प्रोटोकॉलवर राजकारण करणे हे अपरिपक्तेचे लक्षण असल्याचे म्हटले आहे. आरजीएफमध्ये डोनेशन घेताना राहुल गांधींचे डोळे लाल झाले होते का? असा सवालही भाजपने उपस्थित केला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या