29.8 C
Latur
Saturday, December 3, 2022
Homeआंतरराष्ट्रीयपॉवर ग्रीड फेल, बांगला देशात बत्ती गूल

पॉवर ग्रीड फेल, बांगला देशात बत्ती गूल

एकमत ऑनलाईन

ढाका : बांगला देशातील नॅशनल पॉवर ग्रीडमध्ये बिघाड झाल्याने मंगळवारी (४ ऑक्टोबर) संपूर्ण देशात ब्लॅकआउट झाला. सरकारच्या पॉवर युटिलिटी कंपनीने सांगितले की, नॅशनल पावर ग्रिड निकामी झाल्यामुळे बांगला देशातील सुमारे १४० दशलक्ष नागरिकांना वीजेशिवाय राहावे लागले. बांगला देशातील नॅशनल पॉवर ग्रीडमध्ये मंगळवारी दुपारी सुमारे २:०५ वाजता बिघाड झाला. यामुळे बांगला देशच्या उत्तरेकडील काही भाग वगळता देशभरात वीजपुरवठा खंडित झाला आहे.

विद्युत विभागाचे प्रवक्ते शमीम हसन यांनी सांगितले की, राजधानी ढाका आणि इतर प्रमुख शहरांमधील सर्व वीज प्रकल्प बंद करण्यात आले आणि वीज खंडित करण्यात आली. बिघाड कुठे आणि का झाला, हे शोधण्याचा अभियंते प्रयत्न करत असून यंत्रणा पूर्ववत होण्यासाठी काही तास लागू शकतात, असे ते म्हणाले.

डिझेलवर चालणारे प्लांट बंद
आयातीसाठी लागणारा खर्च कमी करण्यासाठी सरकारने सर्व डिझेलवर चालणा-या वीज प्रकल्पांचे कामकाज स्थगित केल्यामुळे किमती वाढल्या आहेत. डिझेलवर चालणारे पॉवर प्लांट बांगला देशातील सुमारे ६ टक्के वीज निर्मिती करतात, त्यामुळे त्यांच्या बंदमुळे उत्पादन १५०० मेगावॅटपर्यंत कमी होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या