31.3 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeआंतरराष्ट्रीयबायडन यांच्या शपथविधीची तयारी सुरू

बायडन यांच्या शपथविधीची तयारी सुरू

एकमत ऑनलाईन

वॉशिंग्टन :अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडन यांच्या २० जानेवारीला होणा-या शपथविधीची तयारी सुरु झाली आहे. शपथविधीवेळी संपूर्ण अमेरिकेत व्हर्च्युअल परेड होणार आहे. याशिवाय व्हाइट हाउस च्या ईस्ट फ्रंटला नवनिर्वाचित अध्यक्ष पास इन रेव्हियू मध्ये सहभागी होणार आहेत, अशी माहिती शपथविधी समितीने दिली.

यूएस कॅपिटॉलच्या वेस्ट फ्रंटला शपथविधी झाल्यानंतर नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडन, फर्स्ट लेडी जिल बायडन, उपाध्यक्ष कमला हॅरिस, त्यांचे पती सेकंड जंटलमन डग्लस एमहॉफ लष्करी सदस्यांसह ईस्ट फ्रंटला होणा-या पास इन रिव् ू मध्ये सहभागी होणार आहेत.

पास इन रेव्हियू ही अमेरिकी लष्कराची परंपरा असून, त्यामध्ये सैन्यदलांच्या नव्या प्रमुखांकडे अधिकार हस्तांतरित केले जातात. या कार्यक्रमाचे यजमान राष्ट्रीय राजधानी क्षेत्राच्या संयुक्त कृती दलाचे कमांडर राहणार आहेत. या वेळी नवनिर्वाचित अध्यक्ष लष्करातील सैनिकांच्या तयारीचा आढावा घेतील. लष्करातील प्रत्येक शाखेचे प्रतिनिधित्व या कार्यक्रमात असेल.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमात सहभागी व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर राखले जाणार आहे. अध्यक्षांच्या शपथविधीची समिती शपथविधी समारंभाचे नियोजन करीत असून, कार्यक्रमादरम्यान कोव्हिड-१९च्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचे विविध नियम पाळले जाणार आहेत, असे सांगण्यात आले.

श्रुतिका माने ठरली ऑस्ट्रेलिया मिस इंडिया ची विजेती

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या