28 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeआंतरराष्ट्रीयराष्ट्रपती मुर्मू लावणार महाराणीच्या अन्त्यसंस्काराला हजेरी

राष्ट्रपती मुर्मू लावणार महाराणीच्या अन्त्यसंस्काराला हजेरी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय त्यांच्यावर १९ सप्टेंबर रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. महाराणी एलिझाबेथ यांचे गुरुवारी ८ सप्टेंबर रोजी निधन झाले. त्या ९६ वर्षांच्या होत्या. तब्बल ७० वर्षे ब्रिटनवर राज्य केल्यानंतर महाराणी एलिझाबेथ यांनी स्कॉटलंडमध्ये अखेरचा श्वास घेतला. सोमवारी राजेशाही इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

त्यांचे पार्थिव लंडनमधील विंडसर येथील किंग जॉर्ज चतुर्थ मेमोरियल चॅपलमध्ये दफन करण्यात येणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राणी एलिझाबेथ कक यांच्या अन्त्यसंस्कारात सहभागी होणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू १७-१९ सप्टेंबर २०२२ रोजी राणी एलिझाबेथ कक यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी लंडन, युनायटेड किंगडमला भेट देणार आहेत.

५०० परदेशी पाहूणे येणार
महाराणीच्या अंत्यसंस्कारासाठी सुमारे ५०० परदेशी नेते उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या सर्वांच्या सुरक्षेसाठी परदेशी नेत्यांनाही विमानतळावरून हेलिकॉप्टर सेवा दिली जाणार नाही, असा निर्णय लंडनमध्ये घेण्यात आला आहे. त्यामुळे येणा-या प्रत्येकाला बसने जावे लागेल.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या