22.9 C
Latur
Wednesday, July 28, 2021
Homeआंतरराष्ट्रीयपंतप्रधान मोदींकडून इराणच्या नव्या राष्ट्रपतींचे अभिनंदन

पंतप्रधान मोदींकडून इराणच्या नव्या राष्ट्रपतींचे अभिनंदन

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : इराणच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणूक निकालानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणचे नवनिर्वाचित राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांचे अभिनंदन केले आहे. शनिवारी जाहीर झालेल्या निवडणूक निकालात कट्टरपंथी गटाचे उमेदवार रईसी यांनी एकतर्फी विजय मिळवला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इब्राहिम रईसी यांना शुभेच्छा देताना म्हटले की, इराणच्या राष्ट्रपतीपदी विजयी झाल्याबद्दल इब्राहिम रईसी यांचे अभिनंदन. भारत आणि इराण यांच्यातील संबंधांना आणखी मजबूत करण्यासाठी एकत्रपणे काम करू असे पंतप्रधान मोदींनी म्हटले. रईसी हे खामेनी यांचे कट्टर समर्थक मानले जातात आणि त्यांचा विजय निश्चित करण्यासाठीच पाच प्रमुख उमेदवारांना अपात्र ठरवण्यात आल्याचे मानण्यात येते.

त्यामुळेच, माजी अध्यक्ष मेहमूद अहमदीनेझाद यांच्यासह अनेक नेत्यांनी या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन मतदारांना केले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव आणि ढासळलेली अर्थव्यवस्था या दोन प्रमुख समस्यांनी इराण ग्रस्त आहे.

भारतात अधिकारी पाठविण्यास फेसबुकची टाळाटाळ

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या