24.6 C
Latur
Sunday, October 24, 2021
Homeआंतरराष्ट्रीयपंतप्रधान मोदींनी दिली कमला हॅरिस यांना खास भेट

पंतप्रधान मोदींनी दिली कमला हॅरिस यांना खास भेट

एकमत ऑनलाईन

वॉशिंग्टन : कोरोना विषाणूची साथ सुरू झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच विदेश दौ-यावर गेले आहेत. तीन दिवसांच्या या दौ-यादरम्यान, मोदी क्वाड समुहाच्या सदस्यांशी चर्चा करणार आहेत. विशेष बाब म्हणजे सर्व बैठकांदरम्यान पंतप्रधान मोदी विविध नेत्यांना काही मौल्यवान भेटवस्तूही देत आहेत. शुक्रवारी मोदींनी अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांच्यासोबत यशस्वी चर्चा केली. तसेच त्यांना खास भेटवस्तूही दिल्या. आता या भेटवस्तूंची चर्चा सुरू आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांना त्यांचे आजोबा पी.व्ही. गोपालन यांच्याशी संबंधित काही जुन्या माहितीच्या प्रति भेट म्हणून दिल्या. या प्रति हस्तशिल्प फ्रेममध्ये सजवण्यात आलेल्या आहेत. गोपालन वरिष्ठ आणि सन्मानित सरकारी अधिकारी होते. त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण पदांवर काम पाहिले होते. याशिवाय पंतप्रधान मोदींनी कमला हॅरिस यांना गुलाबी मीनाकारी असलेला बुद्धिबळाचा सेटही भेट म्हणून दिला.

गुलाबी मीनाकारीचे हे शिल्प जगातील सर्वात जुन्या शहरापैकी एक असलेल्या काशीशी निगडित आहे. हा पंतप्रधान मोदींचा मतदारसंघ आहे. बुद्धिबळाच्या या सेटमधील एक एक मोहरा बारीक कलाकुसर करून हाताने तयार करण्यात आला आहे. यामध्ये काशीचा जिवंतपणा दिसून येतो. शुक्रवारी कमला हॅरिस यांच्याशी झालेल्या चर्चेपर्वी पंतप्रधान मोदींनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्याशी चर्चा केली. त्यांनी मॉरिसन यांना चांदीची मीनाकारी असलेले जहाज भेट दिले. हे जहाजसुद्धा हातांनी तयार करण्यात आले होते.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या