27.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeआंतरराष्ट्रीयभारत-पाकचे पंतप्रधान एकाच व्यासपीठावर येणार

भारत-पाकचे पंतप्रधान एकाच व्यासपीठावर येणार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : एससीओ म्हणजेच शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन समिटचे आयोजन समरकंद, उझबेकिस्तान येथे होत आहे. ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील सहभागी होणार आहेत. या शिखर परिषदेत पहिल्यांदाच पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आमनेसामने असतील.

या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पीएम मोदी आज दुपारी समरकंदला रवाना होतील आणि आज संध्याकाळी ६ वाजता पोहोचतील. उद्या म्हणजेच १६ सप्टेंबर रोजी मोदी एससीओच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांचीही भेट घेतील तेव्हा सर्वांच्या नजरा भारतावर असतील.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या