लंडन : ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स परत एकदा वादात अडकले आहेत. ओबामा बिन लादेनच्या कुटुंबाकडून चार्ल्सने १० कोटी रुपये घेतल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. एका रिपोर्टनुसार प्रिंसच्या सल्लागाराला प्रिंसने ओबामा लादेनच्या कुटुंबाकडून पैसे घेण्यास सांगितले होते. मात्र सल्लागाराने हा सल्ला नाकारला. काही महिन्यांआधीही प्रिंस विवादात अडकले होते.
काही महिन्यांपूर्वी सौदी अरेबियाच्या दोन नागरिकांकडून चॅरिटी फंड घेतल्याचा आरोप प्रिंसवर होता. हे दोन नागरिक ब्रिटनच्या गुप्त संस्थेच्या निशाण्यावर होते. त्यामुळे त्यावेळीही प्रिंस वादाच्या भोव-यात अडकले होते.
‘द संडे टाइम्स’नुसार चार्ल्सने लादेनच्या भावंडांकडून पैसे घेणे चकीत करणारे होते. बकर बिन लादेन आणि शफिर या लादेनच्या दोन भावंडांकडून चॅरिटी फंड घेण्यात आला होता. यात चकीत करण्यारी गोष्ट म्हणजे प्रिंसच्या सल्लागाराने हा फंड घेण्यास मदत केली. १० कोटींची रक्कम २०१३ मध्ये प्रिंस ऑफ वेल्स चॅरिटेबल फंडच्या अकाऊंटमध्ये जमा करण्यात आली होती. मात्र प्रिंसने या पैश््यांचा उपयोग वैयक्तिक उपयोगासाठी केला नाही हेही तेवढेच खरे आहे.
पोलीसांची कार्यवाही होऊ शकते
‘पीडब्ल्यूसीएफ’चे चेअरमन हेशिकच्या मते, फंड घेण्याचा निर्णय प्रिंसचा एकट्याचा नव्हता. एकूण पाच ट्रस्टने यासाठी सहमती दिली होती. मात्र प्रिंस चार्ल्सने अजूनतरी यावर कुठलीच प्रतिक्रिया दिलेली नाही. या प्रकरणात महत्वाचे म्हणजे प्रिंसने हे पैसे तेव्हा घेतले होते जेव्हा दोन वर्षाआधी अमेरिकन नेव्ही सील कमांडोद्वारे पाकिस्तानच्या अबोटाबादमध्ये लादेनला मारण्यात आले होते. त्यावेळी ब्रिटनमध्ये लादेन नेटवर्कबाबत तपास सुरू होता. त्यामुळे अशा परिस्थितीत प्रिंसने लादेनच्या कुटुंबाकडून पैसे का घेतले असावे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
काही वर्षांपूर्वी ब्लॅक लिस्टेड सौदी व्यापा-यांनीही प्रिंसच्या चॅरिटी फाऊंडेशनला मोठी रक्कन दिली होती. या प्रकरणाच्या तपासानंतर चॅरिटी ट्रस्टच्या प्रमुखाने राजीनामा दिला होता. सौदी अरेबियाच्या व्यापा-यांनी ब्रिटनचे नागरिकत्व मिळवण्यासाठी हा फंड दिल्याचा त्यावेळी आरोप करण्यात आला होता.