29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeआंतरराष्ट्रीयइंग्लंडची राणी एलिझाबेथ यांचे पती प्रिन्स फिलीप यांचे निधन

इंग्लंडची राणी एलिझाबेथ यांचे पती प्रिन्स फिलीप यांचे निधन

एकमत ऑनलाईन

लंडन : जगातल्या सर्वात मोठ्या आणि जुन्या राजघराण्याला धक्का देणारी बातमी लंडनमधून आली आहे. ब्रिटीश राजघराण्यातले वयाने सर्वांत ज्येष्ठ सभासद आणि महाराणी एलिझाबेथ यांचे पती प्रिन्स फिलीप यांचे निधन झाले. डयूक ऑफ इडिनबर्ग म्हणून ओळखले जाणारे प्रिन्स फिलीप ९९ वर्षांचे होते.

लंडनमधल्या बकिंगहम पॅलेसने ड्यूक ऑफ एडिनबर्ग यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. राणी एलिझाबेथ (द्वितीय) म्हणजे तत्कालीन राजकुमारी आणि प्रिन्स फिलीप यांचा १९४७ मध्ये विवाह झाला होता. ब्रिटीश राजघराण्यात ७० वर्षं ्यूकपदावर राहिलेले फिलीप हे एकमेव व्यक्तिमत्त्व होते. सुरुवातीला ते ब्रिटीश रॉयल नेव्हीत कार्यरत होते. एका सम्राज्ञीबरोबर ७० वर्षांहून अधिक संसार केला आणि त्यासाठीच त्यांना ओळखले जाते़

प्रिन्स फिलीप प्रथमपासून रूढीवादाला फाटा देणारे म्हणून ओळखले गेले. राजघराण्यात असूनदेखील काही प्रथांना त्यांनी उघड विरोध केला होता आणि ब्रिटीश राजवाड्यात आधुनिकता आणली होती. आता पुढचा महिनाभर ब्रिटीश राजघराण्यात दुखवटा पाळला जाईल. त्यानंतरच महाराणी एलिझाबेथ रॉयल डयूटी सांभाळायला पुन्हा सज्ज होतील.

सचिन वाझेंना २३ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या