27 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeआंतरराष्ट्रीयश्रीलंकेच्या राष्ट्रपती निवासाला आंदोलकांचा वेढा

श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवासाला आंदोलकांचा वेढा

एकमत ऑनलाईन

स्वत:ची सुटका करुन गोताबाया राजपक्षेंनी काढला पळ

कोलंबो : ऐतिहासिक आर्थिक मंदीचा सामना करत असलेल्या श्रीलंकेतही राजकीय अस्थिरता वेगाने वाढीस लागली आहे. राष्ट्रपती गोताबाया राजपक्षे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज (शनिवार) मोठ्या प्रमाणात आंदोलन होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, राष्ट्रपती राजपक्षे यांच्या निवासस्थानाला आंदोलकांनी वेढा घातल्यामुळे ते पळून गेल्याचे वृत्त आहे. देशात शांतता-सुव्यवस्था राखण्यासाठी आणि निदर्शने नियंत्रणात ठेवण्यासाठी पश्चिम प्रांतातील अनेक पोलीस विभागात संचारबंदी लागू करण्यात आली.

गगनाला भिडलेल्या महागाईच्या काळात इंधनाअभावी जनतेचा संतापाचा उद्रेक पहायला मिळत आहे. श्रीलंकेच्या ‘द कोलंबो’ पेज नुसार, खबरदारीचा उपाय म्हणून पश्चिम प्रांतातील नेगोंबो, केलानिया, नुगेगोडा, माउंट लॅव्हिनिया, कोलंबो नॉर्थ, कोलंबो दक्षिण आणि कोलंबो सेंट्रल पोलिस विभागात संचारबंदी लागू करण्यात आला. संचारबंदी भागात प्रवास करण्यास सक्त मनाई असून पोलिसांनी लोकांना इतर पर्यायी मार्गांचा वापर करण्याचा सल्ला दिला.

विशेष म्हणजे, गेल्या अनेक आठवड्यांपासून आर्थिक परिस्थितीमुळे तणाव वाढला आहे. पेट्रोल पंपांवर नागरिक-पोलीस दलाचे सदस्य आणि सशस्त्र दल यांच्यात हिंसक चकमकी झडत आहेत. श्रीलंकेतील लोकांना इंधन मिळवण्यासाठी काही तास किंवा काही दिवस रांगेत उभे राहावे लागते. हिंसाचार आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा अनेक वेळा वापर केला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या