26.6 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeआंतरराष्ट्रीयश्रीलंकेत भडका! आंदोलकांनी पेटवले पंतप्रधान विक्रमसिंगेचे घर

श्रीलंकेत भडका! आंदोलकांनी पेटवले पंतप्रधान विक्रमसिंगेचे घर

एकमत ऑनलाईन

कोलंबो : श्रीलंकेत सध्या मोठी अनागोंदीची स्थिती निर्माण झाली असून नागरिकांच्या रोषापुढे पंतप्रधान रनील विक्रमसिंगे यांना अखेर नमते घ्यावे लागले असून राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यानंतर आक्रमक झालेल्या नागरिकांनी अक्षरश: त्याचे खासगी निवासस्थानही पेटवून दिले आहे.

श्रीलंकेत निर्माण झालेल्या आर्थिक संकटामुळे सर्वत्र अनागोंदी निर्माण झाली आहे. संतप्त नागरिकांनी राष्ट्रपती भवनाचाही ताबा घेतला. त्याठिकाणी नासधूस आणि तोडफोड केली. राष्ट्राध्यक्ष भवनातील खाद्यपदार्थ, बिअर यांच्यावर अनेक आंदोलक ताव मारतानाचे तसेच या भवनाच्या आवारातील स्विंिमग पूलमध्ये खेळतानाचे व्हिडिओ देखील समोर आले आहेत.

काही आंदोलकांनी तर पंतप्रधान रनील विक्रमसिंगे यांच्या खासगी घरावर हल्ला केला असून तिथेही प्रचंड तोडफोड करत हे निवासस्थान पेटवून दिले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या