21.9 C
Latur
Thursday, September 23, 2021
Homeआंतरराष्ट्रीयफ्रांस मध्ये नवीन सुरक्षा कायद्यांच्या विरोधात निदर्शने

फ्रांस मध्ये नवीन सुरक्षा कायद्यांच्या विरोधात निदर्शने

एकमत ऑनलाईन

पॅरीस : फ्रांस सरकारने सुरक्षेसाठी या देशात काही नवीन कायदे लागू करण्याची योजना आखली असून त्या कायद्यांना नागरीकांचा विरोध वाढत चालला आहे. आज पॅरीस मध्ये या कायद्यांच्या विरोधात निदर्शने करणाºया ९५ नागरीकांना अटक करण्यात आली.निदर्शकांनी तत्पुर्वी मोठा हिंसाचारही केला. त्यात सुरक्षा बंदोबस्तास असलेले तब्बल ६५ सुरक्षा रक्षक आणि अधिकारी जखमी झाले आहेत.

फ्रांस सरकारचे हे कायदे सध्या मंजुरीसाठी संसदेपुढे ठेवण्यात आले आहेत. पण नागरीक त्या कायद्यांना कडाडून विरोध करीत असून दर विकएंडला देशात या विधेयकांच्या विरोधात नागरीक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून हिंसक निदर्शने करीत आहेत. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांची डोकेदुखी वाढली आहे.

गेल्या आठवड्यात सुमारे दीड लाख लोकांनी निदर्शने केली होती. पण या आठवड्यात मात्र त्यांची संख्या निम्म्याहून अधिक घटली आहे. आज केवळ ५३ हजार लोक निदर्शनांमध्ये सामील झाले होते अशी माहिती अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाकडून देण्यात आली. आज पॅरीस खेरीज नॅनटेस शहरातील निदर्शने झाली.

भरधाव टेम्पो चालकाने वाहतूक पोलिसाला चिरडले

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या