वॉश्ािंग्टन: केंद्र सरकारच्या नवीन कृषि कायद्यांविरोधात दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला अमेरिकेतूनही पाठिंबा मिहत आहे. अमेरिकेत शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ भारतीय वंशाच्या नागरिकांनी मोर्चे काढले. यामध्ये शीख समुदायाचा मोठा सहभाग होता. सॅन फ्रान्सिको येथील भारतीय वाणिज्य दूतावासावर काढण्यात आलेल्या मोर्चामुळे ‘बे ब्रिज’वरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
कॅलिफोर्नियातील विविध भागात भारतीय शेतकºयांच्या पाठिंब्यासाठी आंदोलन झाले. त्याशिवाय इंडियाना पोलिसमध्ये ही आंदोलन करण्यात आले. आंदोलक गुरिंदर सिंग खालसा यांनी ‘भारतातील या कायद्यामुळे शेती आता खासगी क्षेत्रासाठी उघडण्यात येणार आहे. मोठ्या कॉर्पोरेट घराण्यांना याचा फायदा होणार आहे,असा दावा केला आहे. दरम्यान, या आंदोलनाच्या एक दिवसआधी शिकागोमध्ये शीख-अमेरिकन समुदायाच्या लोकांनी एकत्र येऊन भारतीय दूतावासासमोर मोर्चा काढला.
भरधाव टेम्पो चालकाने वाहतूक पोलिसाला चिरडले