26.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeआंतरराष्ट्रीयपंजाबी गायक निर्वैर सिंग याचा ऑस्ट्रेलियात भीषण अपघातात मृत्यू

पंजाबी गायक निर्वैर सिंग याचा ऑस्ट्रेलियात भीषण अपघातात मृत्यू

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली – पंजाबी गायक निरवैर सिंग याचा मंगळवारी ऑस्ट्रेलियात एका भीषण अपघातात मृत्यू झाला. स्थानिक न्यूजने ही माहिती दिली. वाहिनीने पोलिसांच्या हवाल्याने म्हटले आहे की, मेलबर्नजवळ वेगवान किया सेडान गाडीमुळे दोन मुलांचा पिता असलेला निरवैर हा रस्ते अपघाताचा बळी ठरला.

पोलिसांनी पुढे सांगितले की, ही घटना बुल्ला-डिगर्स रेस्ट रोड येथील डिगर्स रेस्ट येथे दुपारी ३.३० वाजता घडली. या संपूर्ण घटनेत २३ वर्षीय सेडान चालकाला अटक करण्यात आली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ४२ वर्षीय निर्वैर सिंग कामावर जात असताना रस्ते अपघातात सापडला. पोलिसांनी सांगितले की, किया सेडानने आणखी दोन वाहने आणि नंतर एका जीपला धडक दिली, तिची जीप गायकाच्या गाडीसमोर आली. ही धडक इतकी जोरदार होती की निर्वैर सिंगचा जागीच मृत्यू झाला.

स्थानिक न्यूजच्या वृत्तानुसार, जीपमधील एक महिला जखमी झाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, किया सेडान कार परिसरात बेदरकारपणे चालवली जात होती.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या