25 C
Latur
Monday, May 17, 2021
Homeआंतरराष्ट्रीयपुतीन यांच्यावर आयुष्यभर कोणताही खटला चालणार नाही

पुतीन यांच्यावर आयुष्यभर कोणताही खटला चालणार नाही

एकमत ऑनलाईन

मास्को : रशियन संसदेचे कनिष्ठ सदन डुमामध्ये एक विधेयक पास झाले आहे ज्याच्याअंतर्गत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि त्यांच्या कुटुंबावर ते राष्ट्राध्यक्ष नसले तरी कोणताही फौजदारी खटला चालवता येणार नाही. हे विधेयक त्या घटनादुरुस्त्यांचा भाग आहे ज्यांना जुलै महिन्यात एका सार्वमताव्दारे मंजुरी दिली गेली होती. पुतीन यांच्या समर्थकांकडे संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये बहुमत आहे.

व्लादिमीर पुतीन यांचा कार्यकाळ २०२४ ला पूर्ण होईल, पण या घटनादुरुस्त्यांमुळे त्यांना आपला कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतरही दोन टर्म म्हणजे १२ वर्षं राष्ट्राध्यक्ष पदावर राहाता येईल. हे विधेयक आल्यानंतर पुतीन यांच्या राजकीय भविष्याबद्दल तर्कवितर्क सुरू झाले आहेत. सन २००० पासून पुतीन राष्ट्राध्यक्ष आहेत आणि त्यांनी आपल्या कार्यकाळात सत्तेचा भरपूर वापर केला आहे.

पुतीन यांचे विरोधक अ‍ॅलेक्सी नवलानी यांनी हे विधेयक आल्यानंतर ट्वीट केले आहे, पुतीन यांना आता बचावासाठी विधेयकाची काय गरज आहे? यानंतर नवलानी यांनी ट्वीट करून एक प्रश्न विचारला की, हुकूमशाह काय आपल्या मनाला वाटेल तेव्हा पद सोडू शकतात का? डुमात हे विधेयक तीन वेळा मांडले जाणार आहे. मंगळवारी, १७ नोव्हेंबरला, पहिल्यांदा हे विधेयक पारित केले गेले़ सदनात पुतीन यांचा पक्ष युनायटेड रशियाला बहुमत आहे पण डाव्या पक्षांच्या ३७ खासदारांना या विधेयकाच्या विरोधात मतदान केले. याशिवाय अजून दोनदा हे विधेयक डुमात मांडले जाईल आणि त्यानंतर हे विधेयक फेडरेशन काऊन्सिल, म्हणजे संसदेच्या वरिष्ठ सदनात जाईल आणि सरतेशेवटी राष्ट्रपती पुतीन याच्यावर स्वाक्षरी करतील.

काय आहे या विधेयकात?
या नव्या विधेयकांतर्गत माजी राष्ट्रपती आणि त्यांचे कुटुंबीय कोणत्याही प्रकारचे फौजदारी खटले, पोलिस तपास यांच्या कक्षेतून बाहेर राहतील. त्याबरोबरच त्यांची संपत्ती जप्त करता येणार नाही.

दुर्मीळ गुन्हे वगळले
दुर्मीळ परिस्थितीत केलेले मोठे गुन्हे किंवा कथित राजद्रोहाच्या घटना वगळता राष्ट्रपतींच्या हयातीत त्यांच्यावर किंवा त्यांच्या कुटुंबीयांवर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करून खटला चालवता येणार नाही.

माजी मुख्यमंत्री चव्हाण यांना आयकरची नोटीस

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,496FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या