वॉशिंग्टन : एफबीआय अर्थात फेडरल ब्युरो ऑफ इन्वेस्टिगेशनने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या घरी छापेमारी केली. या छापेमारीत ६ गोपनीय कागदपत्रे तपास यंत्रणेच्या हाती लागली आहेत.
डेलावेयर येथील विल्मिंग्टन स्थित बायडेन यांच्या घरावर एफबीआयने छापेमारी केली. सुमारे १३ तास झाडाझडती घेतल्यानंतर तपास अधिका-यांनी बायडेन यांच्या घरातून ६ गोपनीय कागदपत्रे जप्त केली आहेत.