26.8 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeआंतरराष्ट्रीयअमेरिकेत पुन्हा गोळीबार; 3 ठार

अमेरिकेत पुन्हा गोळीबार; 3 ठार

एकमत ऑनलाईन

मेरीलॅँड : अमेरिकेत वेगवेगळ्या ठिकाणी उघड गोळीबाराच्या घटना समोर येत आहेत, यात निष्पाप लोक मारले जात आहेत. स्मिथबर्गमधील मेरीलँड शहरात गोळीबार झाला असून यात तीन जणांचा मृत्यू झालाय. उत्तर मेरीलँडमधील एका मॅन्युफॅक्चरगिं प्लांटवर एका बंदुकधारी व्यक्तीना गोळीबार केला.

ज्यात किमान तीन जण ठार झाले आणि अन्य काहीजण गंभीर जखमी झाले.याशिवाय, न्यूयॉर्क, टेक्साससह अनेक भागात गोळीबार करण्यात आला असून निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला. दरम्यान, अमेरिकेतील फिलाडेल्फियामध्ये शनिवारी रात्री उशिरा एका बंदूकधा-याने जमावावर अंदाधुंद गोळीबार केला. या घटनेत आतापर्यंत किमान 3 जणांचा मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झाले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या